
नवी दिल्ली : तृमणूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्यावर माजी राजनैतिक अधिकारी लक्ष्मी मुरडेश्वर पुरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, संबंधित प्रकरण सामोपचाराने सोडवा, कारण न्यायालयात अन्य अनेक खटले प्रलंबित आहेत, असे न्यायाधीश अनिल क्षेत्रपाल, आणि हरिश वैद्यनाथ शंकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी सुचविले.