अंगणवाडी योजनेच्या लाभासाठी हवा आधार

केंद्राकडून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे; लहान मुलांना ‘आधार’चे बंधन नाही
Saksam Anganwadi Aadhaar Card Mandatory Mother Aadhaar Card avail this scheme
Saksam Anganwadi Aadhaar Card Mandatory Mother Aadhaar Card avail this schemesakal
Updated on

नवी दिल्ली : सर्व लाभार्थ्यांना अंगणवाडी सेवा योजनेचा लाभ घेता येणार असून त्यासाठी ‘आधार’सह नोंदणी बंधनकारक असेल, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. ‘सक्षम अंगणवाडी’ आणि ‘पोषण-२.०’ साठीची नवी मार्गदर्शक तत्त्वे आज केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लहान मुलांचे ‘आधार कार्ड बंधनकारक नसेल, आईच्या आधार कार्डचा वापर करून देखील या सुविधांचा लाभ घेता येईल, असे महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. या सगळ्या योजनांचा संबंधित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जात, धर्म आणि उत्पन्नाच्या निकषाचा विचार केला जाणार नाही.

यासाठी केवळ संबंधित लाभार्थ्याने जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये आधार क्रमांकासह नोंदणी करणे गरजेचे असेल, किशोरींसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा मुलींना लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी देखील आधार क्रमांक अनिवार्य असेल, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना या योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर संबंधित राज्यांना महिला लाभार्थी निश्चित करावेत असे सांगण्यात आले. नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘पोषण-२.०’ ला आयुष प्रणालीदेखील जोडण्यात येईल, ‘आयुष’च्या योगविषयक मोहिमांचा देखील याद्वारे प्रचार करण्यात येईल. सर्वसामान्य लोकांना योगविषयक माहिती आणि त्याचे फायदे देखील पटवून देण्यात येतील. आयुष मंत्रालय या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक आधार पुरविणार आहे. देशातील सात लाख नोंदणीकृत आयुष डॉक्टर या योजनेचा प्रचार आणि प्रसार करतील, असे सरकारकडून सांगण्यात आले.

ईशान्येकडील राज्यांच्या गरजेचा विचार

‘पोषण- २.०’ या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींसाठीच्या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. लक्ष्य लाभार्थी गटांमध्ये आता १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने आसाम आणि ईशान्येकडील राज्यांतील जिल्ह्यांची गरज लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. याआधी अकरा ते चौदा वर्षे वयोगटातील किशोरी त्यासाठी पात्र ठरविल्या जात होत्या. कुपोषणाच्या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘सक्षम अंगणवाडी’ आणि ‘पोषण-२.०’ ची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे सरकारकडून जारी करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com