चार दिवसांत कोट्यवधींची ग्रंथविक्री

चार दिवसांत कोट्यवधींची ग्रंथविक्री
Updated on

नवी दिल्ली - राजधानीतील प्रगती मैदान सध्या ओसंडून वाहते आहे... नॅशनल बुक ट्रस्टच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लाखो ग्रंथरसिकांची गर्दी कडाक्‍याच्या थंडी आणि अवकाळी पावसालाही न जुमानता प्रगती मैदानाकडे येत आहे. जगभरातील ६०० प्रकाशक, ५६ भाषांमधील सुमारे सव्वा कोटी पुस्तकांचा हा मेळा यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. 

‘गांधी लेखकांचे लेखक’ या नावामध्येच एक लेखक, प्रकाशक व संपादक म्हणून गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे पैलू यानिमित्ताने उलगडला जात आहेत. मुख्य दालन वगळता मराठी पुस्तके व प्रकाशक मात्र भिंग घेऊनच शोधावी लागतात हेदेखील वास्तव आहे. 

एनबीटी, साहित्य अकादमी व विश्‍वकर्मा प्रकाशन अशा तीनचार दालनांतच मराठीचे अस्तित्व जाणवते. एनबीटीचे गांधीजींवरील ५६ मराठी पुस्तकांचे दालन आहे. मराठी प्रकाशक संघाने ही पुस्तके येथे मांडली आहेत. साने गुरुजींपासून गोविंद तळवलकरांपर्यंतच्या नामवंत लेखकांची महात्मा गांधीजींवरील पुस्तके येथे आहेत. मराठी दालनात तीन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गांधीजींची पत्रकारिता, जनसंपर्क व त्यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयांवरील पहिल्या परिसंवादात वर्धा येथील गांधी विद्यापीठाचे बुद्धदास मिरगे, मीडिया वॉचचे अविनाश दुधे, राजीव दीक्षित ट्रस्टचे मदन दुबे आदींनी विचार मांडले. महात्मा गांधी हे या शतकातील महानतम संवादक ठरले, अशी भावना या वेळी व्यक्त झाली. 

श्रीकृष्ण काकडे यांच्या ‘भटके विमुक्त समाज ः भाषा व संस्कृती’ या ग्रंथाचे प्रकाशन उद्या (ता. ८)  शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर गांधीजींवरच आणखी एक परिसंवाद शनिवारी (ता. ११) होईल.

मध्यवर्ती म्हणजेच थीम पॅव्हेलियनमध्ये गांधीजींवरील लघुपट कायम सुरू असतात. गांधींजींचे विविध रूपांतील प्रत्यक्ष व दुर्मीळ चित्रीकरण येथे पहायला मिळते. 

फ्रेंच, जर्मनी, रशिया, स्पेन, इराण, संयुक्त अरब अमिराती आदी देशांतील प्रकाशक येथे आले आहेत. ओरिएंटल, हार्पर कोलिन्स, पेंग्विन आदी नामवंत प्रकाशक आहेत. यंदा पहिल्या चार दिवसांतच कोट्यवधींची ग्रंथविक्री झाल्याचे सांगण्यात येते.

मराठी में कितनी किताबे हैं...
खर्च आणि विक्री याचा ताळमेळ बसत नसल्याने मराठी प्रकाशकांना येथे येण्यात फारसे स्वारस्य नसते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि एनबीटीचे हे प्रदर्शन यांच्या तारखा आसपासच्याच येतात. त्यामुळेही मराठी दालनांची संख्या कमी  आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा त्यांनी मराठी भाषेतील एक पुस्तक हाती घेऊन मराठीच्या सहायक संपादिका निवेदिता मदाने यांना विचारले की, बापूजी के उप्पर मराठी में कितनी किताबे हैं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com