

Salim Wastik
esakal
दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचने सलीम वास्तिक नावाच्या एका अशा गुन्हेगाराला अटक केली आहे, जो गेल्या ३१ वर्षांपासून पोलिसांना चकवा देऊन फरार होता. एखाद्या फिल्मी कथेला शोभावा असा सलीमचा प्रवास आणि त्याच्या अटकेचा थरार आता समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम वास्तिक हा केवळ एक गुन्हेगार नव्हता, तर त्याने आपली ओळख पूर्णपणे बदलून सोशल मीडियावर एक वेगळीच प्रतिमा तयार केली होती.