सलमानच्या शिक्षेवरील सुनावणी 17 जुलैला

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

या प्रकरणात सलमान खान सध्या जामीनावर बाहेर आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला सलमान खान याला जोधपूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तर त्याच्याबरोबर सह आरोपी असलेल्या चौघांची निर्दोष निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याने शिक्षेविरोधात केलेल्या अपीलावरील सुनावणी 17 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

या प्रकरणात सलमान खान सध्या जामीनावर बाहेर आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला सलमान खान याला जोधपूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तर त्याच्याबरोबर सह आरोपी असलेल्या चौघांची निर्दोष निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सलमान शिक्षेनंतर दोन दिवस कारागृहात राहिल्यानंतर जामीनावर मुक्त झाला होता. आता त्याच्या वकीलांनी न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील केले आहे. आज (सोमवार) या प्रकरणाची सुनावणी होती. या सुनावणीसाठी सलमान हजर होता. न्यायाधीशांनी आता या प्रकरणाची सुनावणी 17 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. 

वीस वर्षांपूर्वी एक व दोन ऑक्‍टोबर 1998 रोजी 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी कांकणी गावात दोन काळविटांची शिकार केल्या प्रकरणी सलमान खानला दोषी ठरविण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 51 नुसार सलमानवर गुन्हा दखल करण्यात आला होता, तर त्याला शिकारीला प्रवृत्त केल्याचा आरोप अन्य चार कलाकारांवर होता. त्या दिवशी रात्री हे सर्व कलाकार जिप्सी कारमधून फिरत होते. सलमान गाडी चालवत होता. त्या वेळी त्यांना काळविटांचा कळप दिसल्यावर सलमानने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दोन काळविटांचा मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan blackbuck case in Jodhpur Court