सलमान खानच्या पुतण्याचे मुंबईत निधन

वृत्तसंस्था
Tuesday, 31 March 2020

अभिनेता सलमान खानच्या पुतण्याचे काल (ता.३०) सोमवारी निधन झाले. अब्दुल्ला खान उर्फ ​​आबा असे त्याचे नाव होते. तो इंदूरमधील खान कंपाऊंड इथे राहत होता. अब्दुल्लाला रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या फुफ्फुसात पाणी झाल्यानं इनफेक्शन झाल्याचं सांगण्यात आले आहे. संध्याकाळी श्वास घेताना त्रास होत असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या पुतण्याचे काल (ता.३०) सोमवारी निधन झाले. अब्दुल्ला खान उर्फ ​​आबा असे त्याचे नाव होते. तो इंदूरमधील खान कंपाऊंड इथे राहत होता. अब्दुल्लाला रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या फुफ्फुसात पाणी झाल्यानं इनफेक्शन झाल्याचं सांगण्यात आले आहे. संध्याकाळी श्वास घेताना त्रास होत असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सलमान खानचा चुलत भाऊ मतीन खान याचा तो मुलगा होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्लाला हृदय व शुगरचा आजार होता. तो बॉडीबिल्डर आणि जास्त वजनदार होता. त्याचे हृदय 30 टक्क्यांपेक्षा कमी काम करत होते, असे डॉक्टरांनी सांगितले. मृत्यूनंतर कोरोनाच्या शंकेमुळे पोलिस-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे कॉल सुरू झाले होते असेही त्याने यावेळी सांगितले.

Coronavirus : क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? ते केल्याने काय होईल?

तत्पूर्वी, अब्दुल्ला सलमान खानसमवेत मुंबईला गेला आणि अनेक आंतरराष्ट्रीय मंडळाच्या प्रशिक्षकांसोबत राहून स्वतःला ट्रांसफॉर्म केलं. काही काळापूर्वी त्याने जिम उपकरणांचा ब्रँड सुरू केला होता. सलमानच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो महेश्वरलाही गेला होता. सलमान खान आणि तो दुचाकीवर फिरतानाचा फोटो तेव्हा समोर आला होता. गेल्या वर्षी अब्दुल्लाचा अपघात झाला होता. त्याला अनेक औषध खावी लागत होती. पण 23 मार्चला त्याने औषध घेतले नाही. म्हणून काम करताना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या, यातूनच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan's nephew Abdullah dies at 38