esakal | समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी ब्राह्मण समाजाला साद घातली
sakal

बोलून बातमी शोधा

Samajwadi Party

समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी ब्राह्मण समाजाला साद घातली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ - प्रतिस्पर्धी बहुजन समाज पक्षाचा (BSP) कित्ता गिरवीत समाजवादी पक्षानेही (Samajwadi Party) आगामी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhansabha Election) ब्राह्मण समाजाला (Brahman Society) साद घातली आहे. या समाजापर्यंत पोचण्यासाठी बुद्धिवंतांच्या अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येईल. (Samajwadi Party Called on the Brahman Community for Assembly Elections)

बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या पक्षाने यापूर्वीच परिषद आयोजित केली. त्यास प्रबुद्ध संमेलन असे संबोधण्यात आले. सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा हे बसपमधील ब्राह्मण समाजाचा चेहरा मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येत नुकतेच हे संमेलन पार पडले.

या तुलनेत सपने वेगळी शाखा स्थापन केली आहे. प्रबुद्ध असेच या शाखेचे नाव आहे. या शाखेचे तसेच परशुराम पीठाचे नेते रविवारी सपचे प्रमुख अखिलेश यादव यांना भेटले. पुढील महिन्यापासून बैठकांचे आयोजन करण्यास अखिलेश यांनी होकार दर्शविला असून बलिया येथून हा उपक्रम सुरु होईल. परशुराम पीठाचे प्रमुख आणि माजी आमदार संतोष पांडे यांनी अशा बैठका घेण्याची इच्छा दर्शविली असून अखिलेश यांची अनुमती आहे, अशी माहिती सपचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी दिली.

हेही वाचा: आसाम-मिझोराम सीमावादाचे ‘ट्विटवॉर’; मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची

विधानसभेचे माजी अध्यक्ष माताप्रसाद पांडे, प्रबुद्ध सभेचे अध्यक्ष मनोज पांडे, सनातन पांडे यांच्यासह ब्राह्मण समाजातील वरिष्ठ नेते या संमेलनांसाठी पक्षाचे धोरण आखत आहेत. हे नेते राज्याच्या विविध भागात दौरे आणि परिषदांचे आयोजन करतील. त्याद्वारे आगामी निवडणुकीपूर्वी उच्च जातींमधील मतदारांशी संवाद साधण्यात येईल. आपले सरकार होते त्या काळात काय कार्य केले याची माहिती दिली जाईल.

भाजप सरकारच्या राजवटीत ब्राह्मणांचा आणि इतरांचा छळ केला जात असल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप आहे. अत्याचाराचेही आरोप होत आहेत. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार आले तरच न्याय मिळेल याची जाणीव जनतेला झाली आहे.

- राजेंद्र चौधरी, सपचे प्रवक्ते

loading image
go to top