पाकिस्तानने रद्द केलेल्या "समझोता एक्‍सप्रेस'चा काय आहे इतिहास?

वृत्तसंस्था
Thursday, 8 August 2019

अशी आहे "समझोता' 
- सहा स्लीपर कोच आणि एक एसी-3 टीअर कोच 
- आठवड्यातून दोनदा धावते 
(भारतात दिल्ली ते अटारी आणि पाकिस्तानात लाहोर ते वाघा) 
- प्रवासाचे एकूण अंतर 52 किमी 

नवी दिल्ली : 1971 ला भारताने युद्धात पाकिस्तानला पाणी पाजत त्या देशाचे दोन तुकडे केले. या युद्धानंतर दोन्ही देशांमधील कटुता वाढली होती. ही कटुता कमी करण्यासाठी दोघांमध्ये झालेल्या सिमला करारानुसार 22 जुलै 1976 ला समझोता एक्‍सप्रेसला सुरवात झाली. हीच गाडी "मैत्री एक्‍सप्रेस' म्हणूनही परिचित आहे. दिल्लीपासून लाहोर दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेची सेवा नंतर अनेकदा विविध कारणांनी स्थगित करण्यात आली होती. 

अशी आहे "समझोता' 
- सहा स्लीपर कोच आणि एक एसी-3 टीअर कोच 
- आठवड्यातून दोनदा धावते 
(भारतात दिल्ली ते अटारी आणि पाकिस्तानात लाहोर ते वाघा) 
- प्रवासाचे एकूण अंतर 52 किमी 

रेल्वेसेवेत झालेला बदल 
- सुरवातीला ही गाडी दररोज धावत असे. नंतर 1994 पासून आठवड्यातून दोनदाच सेवा सुरू. 
- आधी ही रेल्वे एकाच दिवसात माघारी येत असे. 2000 सालापासून ती मुक्कामी असते. 
- आधी एकाच रेल्वेद्वारे पूर्ण प्रवास केला जात होता. आता अटारीला प्रवाशांना रेल्वे बदलावी लागते. या गाडीची प्रत्येक वेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून संपूर्ण तपासणी केली जाते. 

केव्हा केव्हा स्थगिती ? 
- 13 डिसेंबर 2001 ला संसदेवर हल्ला झाल्यानंतर 1 जानेवारी 2002 पासून ते 15 जानेवारी 2004 पर्यंत. 
- 27 डिसेंबर 2007 ला बेनझीर भुट्टोंची हत्या झाल्यानंतर. 
- 8 ऑक्‍टोबर 2012 ला भारतात प्रवेश करणाऱ्या या रेल्वेमध्ये 100 किलो हेरॉइन आणि 500 काडतुसे सापडल्यानंतर. 
- 28 फेब्रुवारी 2019 : पुलवामा हल्ल्यानंतर 

2007 चा बॉंबहल्ला 
दिल्लीहून अटारीकडे निघालेल्या समझोता एक्‍सप्रेसवर पानिपतनजीक 19 फेब्रुवारी 2007 ला हल्ला झाला. यात 70 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतेक जण पाकिस्तानी नागरिक होते, तर उर्वरित रेल्वेच्या सुरक्षेसाठी असलेल्या भारताचे काही जवान होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samjhauta express history in marathi