

Citizens become 'warriors' against cyber fraud; 'Sanchar Saathi'
Sakal
नवी दिल्ली : दूरसंवाद क्षेत्रातील वाढत्या सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी देशभरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या ‘संचार साथी’ पोर्टलला (www.sancharsaathi.gov.in) जोरदार पसंती दिली आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या पोर्टलला नागरिकांनी आतापर्यंत ३० कोटींपेक्षा अधिक वेळा भेट दिली आहे. या पोर्टलमुळे संशयास्पद कॉल-मेसेजची तक्रार करणे, स्वतःच्या नावावरील सिमकार्ड तपासणे आणि हरवलेला मोबाईल ब्लॉक करणे सहज शक्य झाले असून, प्रत्येक सजग नागरिक सायबर फसवणुकीविरुद्ध ‘सायबर योद्धा’ म्हणून काम करत असल्याचे दूरसंचार विभागाने (DoT) म्हटले आहे.