Constitution Day | "संविधानाबाबत राजभवनात तर..." संजय राऊत यांचा राज्यपालांवर निशाणा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'संविधानाबाबत राजभवनात तर...' राऊत यांचा राज्यपालांवर निशाणा

'संविधानाबाबत राजभवनात तर...' राऊत यांचा राज्यपालांवर निशाणा

sakal_logo
By
ओमकार वाबळे

संविधान दिनाच्या निमित्ताने दिल्लीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याला सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. या बहिष्काराला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं राऊत यांनी सांगितलं. देशात दररोज संविधानाची पायमल्ली होत असताना, हुकूमशाही पद्धतीने काम सुरू असताना, आणि राज्यांचे अधिकार तोडले जात असताना हे सरकार संविधान दिन साजरा करण्याचं नाटक का करता, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्रात संविधानाबाबत काय सुरू आहे, राजभवनात काय चाललंय हे सगळ्यांना माहित आहे, असं राऊ म्हणाले.

'ते' वकील एसटी कामगारांचं कुटुंब जगवायला येणार नाहीत!

यावेळी राऊत यांनी एसटी कामगारांच्या संपावरही भाष्य केलंय. कामगारांनी कुटुंबाचा विचार करावा, यातच त्यांच भलं आहे. जे वकील त्यांना आत्ता भडकवत आहेत, ते कामगारांचं कुटुंब जगवायला येणार नाहीत, असं म्हणत राऊत यांनी सदावर्तेंना टोला लगावला. आम्ही गिरणी कामगारांचं काय झालं हे पाहिलंय, त्यामुळे एसटी कामगारांनी शहानपणाने निर्णय घ्यावा, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी एसटी कामगारांनी संप ताणू नये, असं आवाहन केलं. कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांना भरघोस पगारवाढ दिली आहे. त्यामुळे संप मागे घ्यावा असं ते म्हणाले.

loading image
go to top