esakal | "तेव्हा आमचे फोनही टॅप करण्यात आले"; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-Sanjay-Raut

"तेव्हा आमचे फोनही टॅप करण्यात आले"; राऊतांचा खळबळजनक आरोप

sakal_logo
By
विराज भागवत

नवी दिल्ली: पेगासस (Pegasus) या फोन हॅकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगभरातील हजारो लोकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, असा दावा द गार्डियन, द वॉशिंग्टन पोस्ट आणि भारताच्या द वायर अशा एकूण 17 प्रसारमाध्यमांनी केला. यात भारतीय राजकीय नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे, असा दावाही करण्यात आला. पण हा दावा भारत सरकारने फेटाळून लावला. असे असले तरी या दाव्याची चांगलीच चर्चा रंगली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: 'गोपनीयता जपण्यासाठी बांधिल'; Pegasus हॅकिंग प्रकरणी भारताचं उत्तर

"पेगासेस फोन टँपिंग प्रकरणाबद्दल आम्ही संसदेच्या आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहोत. पत्रकारांचे व राजकीय नेत्यांचे फोन टँपिंग करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. देशाचं प्रशासन आणि सरकार कमजोर असल्याचे हे लक्षण आहे. कुणीही येतं आणि आमचे फोन टॅप करतं ही खुली हुकूमशाही सुरु आहे. देशाच्या सुरक्षेला यामुळे धोका आहे. तसेच, देशात यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनताना आमचे फोन टॅप झाले होते. अर्थात, ते राज्यातील झाले", असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. तसेच, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी समोर यावे आणि फोन टँपिंगविषयी उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: राजकीय नेते, पत्रकारांवर पाळत? व्यक्तींच्या नावाची यादी उघड

दरम्यान, पाळत ठेवण्यासाठी संभाव्य लक्ष्य म्हणून जगभरातील व्यक्तींच्या नावांची तयार केलेली यादी ‘लिक’ झाली असून यामध्ये चाळीस भारतीय पत्रकारांची नावे असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व पत्रकार संवेदनशील विषयांवर काम करत होते. ‘द वायर’ या वृत्तसंस्थेने ही माहिती उघड केली आहे. भारतातील हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क १८, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्त समूहांच्या वरिष्ठ पत्रकारांचे मोबाईल क्रमांक या यादीत असल्याची चर्चा आहे.

loading image