संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.
सातारा : राज्यातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच साताऱ्यातील दोघांनी थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर (German Girl) अत्याचार केल्याने देशासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सातारच्या कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील सहा मित्र थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते.