Odisha Police : पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेला 'तो' इंजिनिअर विहेतील; पाटण तालुक्यात खळबळ

पाटण तालुक्यातील विहे हे त्याचे मूळ गाव असून, गेल्या महिन्यामध्ये तो गावी आला होता.
Software Engineer Abhijit Jambure
Software Engineer Abhijit Jambureesakal
Summary

अभिजित यास ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने पुणे येथे अटक केली आहे.

मल्हारपेठ : पाकिस्तानी इंटेलिजन्सच्या (Pakistani Intelligence) हस्तकांना ओटीपी (वन टाइम पासवर्ड) शेअर केल्याच्या घोटाळ्यात कथित सहभागाबद्दल अटक केलेला पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर अभिजित संजय जंबुरे हा मूळचा विहे (ता. पाटण) येथील आहे.

दरम्यान, अटकेच्या या वृत्ताने तालुक्यात (Vihe Patan) खळबळ उडाली आहे. अभिजित जंबुरे (Abhijit Jambure) हा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर (Software Engineer) म्हणून काम करत होता. तो ओटीपी विक्री आणि शेअरिंग घोटाळ्यात त्याचा सहभाग होता, असा संशय आहे.

Software Engineer Abhijit Jambure
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

पाटण तालुक्यातील विहे हे त्याचे मूळ गाव असून, गेल्या महिन्यामध्ये तो गावी आला होता. त्याने गावात नवीन दुमजली बंगला बांधला आहे. दरम्यान, अभिजित यास ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने पुणे येथे अटक केली असून, पुणे न्यायालयातून त्यास तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला ओडिशामधील भुवनेश्‍वर येथे नेण्यात आले.

अभिजित याने गुजरातमधील आनंद येथील विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत होता. मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर व त्यांच्या पथकाने बुधवारी विहेतील अभिजित याच्या घरी जाऊन माहिती घेतली.

Software Engineer Abhijit Jambure
NCP Crisis : ज्या पक्षात मी राहिलो, त्या पक्षाचा विश्वासघात कधी केला नाही; भास्कर जाधवांचा तटकरेंवर थेट वार

दरम्यान, याबाबत सहायक पोलिसांशी संपर्क केला असता आम्हाला वरिष्ठांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचे आदेश नाहीत. तो विहेतील असल्याचे समजल्याने आम्ही विहे येथे जाऊन माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com