राफेलच्या पहिल्या भरारीचा मान मराठमाेळ्या सौरभला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

लातूर जिल्ह्यातील उदगीरात बालपण गेलेल्या भारतीय हवाई दलातील मराठमोळ्या स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेलच्या पहिल्या भरारीचा मान मिळाला आहे. ​

उदगीर : लातूर जिल्ह्यातील उदगीरात बालपण गेलेल्या भारतीय हवाई दलातील मराठमोळ्या स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना अत्याधुनिक लढाऊ विमान राफेलच्या पहिल्या भरारीचा मान मिळाला आहे. 

भारतीय वायुदलामध्ये अत्याधुनिक लढाऊ विमान राफेल सहभागी झाल्याचा आनंद भारतीयांना झाला आहे. परंतु, राफेल विमान उडवण्याचा पहिला मान उदगीरात बालपण गेलेल्या स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना मिळाल्याने येथील नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे. 

स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांचे उदगीर हे आजोळ आहे. कर्नाटकातील बिदर हे त्यांचे मूळ गाव असले तरी त्यांचे आई-वडील दोघेही उदगीर येथे एका बँकेमध्ये नोकरीस होते. त्यामुळे अम्बुरे कुटुंबीय उदगीरात वास्तव्यास होते. स्क्वाड्रन लीडर सौरभ अम्बुरे यांचे प्राथमिक शिक्षण येथील विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल येथे झालेले आहे, त्यानंतर त्याचे पुढील शिक्षण हे सातारा सैनिक स्कूल येथे झाले आहे. स्क्वाड्रन लीडर अम्बुरे यांचे आई-वडील सध्या हैदराबाद येथे राहत असल्याचे त्यांच्या उदगीर येथील आजोळमधील नातलगांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saurabh Ambure is privileged to flew Rafale for the 1st time