
नवी दिल्ली : नवतरुणी तिचे सौंदर्य, सौंदर्यातील विविध छटा, प्रेम प्रकरण, प्रेमभंग, यापासून ते निसर्गातील विविध छटा निसर्गाचे विविध रूप, शेतकऱ्यांची व्यथा, शाळा, आपले गाव, शहर आदीचे वर्णन करणाऱ्या कवितांनी आज दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतील सयाजीराव गायकवाड सभामंडपात कवी संमेलनाने तब्बल 11 तासाहून अधिक काळ सुरू राहण्याचा विक्रम केला.