मोदींच्या क्लिन चीटवरील याचिकेवर होणार सुनावणी

SC to hear Zakia Jafri's plea against clean chit to Modi on April
SC to hear Zakia Jafri's plea against clean chit to Modi on April

नवी दिल्ली : गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चिट देणाऱ्या विशेष तपास पथकाच्या अहवालावरील आव्हान याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज तयारी दर्शविली.

न्यायालयाने यासाठी 14 एप्रिल ही तारीख निश्‍चित केली आहे. कधीकाळी या दंगलीमध्ये मारल्या गेलेले माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी ही याचिका सादर केली आहे. याआधीही अनेक वेळा या प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आलेली आहे, कधी ना कधीतरी यावर सुनावणी घ्यावीच लागेल, असे सांगत न्यायालयाने यासाठीची तारीख निश्‍चित केली.

आजच्या सुनावणीदरम्यान झाकिया यांच्या वकिलांनी होळीनंतर आमच्या याचिकेवर सुनावणी घ्या, अशी विनंती न्यायालयाकडे केल्यानंतर न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. दिनेश माहेश्‍वरी यांच्या खंडपीठाने ती मान्य केली. आतापर्यंत या प्रकरणाच्या सुनावणीला अनेकदा स्थगिती देण्यात आली आहे, ज्या दिवशी सर्वच उपलब्ध होऊ शकू, अशी एखादी तारीख निश्‍चित करा, असेही न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com