चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ; जामीनावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय आणि काँग्रेस नेते अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांना हा मोठा झटत बसला आहे. 

आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वीच चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. 

आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना 21 ऑगस्टला दिल्लीतील निवासस्थानावरून सीबीआयने अटक केली होती. सीबीआय आणि ईडी हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यामुळे  सीबीआयनंतर आता ईडीदेखील चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करू शकते. 

INX media भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडी देखील चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करु शकते.

सर्वोच्च न्यायालयाचे म्हणने आहे की, जर एखाद्या तपास यंत्रणेने कोणाला अटक केली असेल, आणि कोणत्याही आरोपांविरोधात त्या व्यक्तीची चौकशी करायवयाची असेल, तर त्याची अटकपूर्व जामीन याचिका आपोआपच निष्प्रभ होते. जर जामीन हवा असेल, तर त्यासाठी योग्य न्यायालयात जावे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या वकिलांना दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SC refused to hear P Chidambarams bail