
नवी दिल्ली : नागरिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्यायला हवे, या बाबतीत त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदविले. समाजमाध्यमांवरील चिथावणीखोर पोस्टला आळा घालण्यासाठी न्यायालय हे मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या विचारात आहे. न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने हे निर्देश दिले आहेत.