Electoral Bonds: 'प्रसिद्धीसाठी हे सुरु आहे, आणखी बोलायला लावू नका'; सरन्यायाधीशांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षांना सुनावलं

SCBA चे (Supreme Court Bar Association) अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील अधीष अग्रवाल यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं आहे.
 DY Chandrachud
DY Chandrachud

नवी दिल्ली- SCBA चे (Supreme Court Bar Association) अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील अधीष अग्रवाल यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं आहे. अधीष अग्रवाल यांनी सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांसंदर्भात दिलेल्या निकालावर आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी आधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर त्यांनी देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना देखील पत्र लिहिलं होतं.

सरन्यायाधीश म्हणालेत की, तुम्ही आम्हाला निवडणूक रोख्यांसंदर्भात घेतलेल्या निकालाचा पुनर्विचार करण्यास सांगत आहात. हे सर्व काही प्रसिद्धसाठी सुरु असल्याचं आम्हाला दिसत आहे. त्यामुळे यात लक्ष घालावे असं आम्हाला वाटत नाही.(SCBA President Adhish Aggarwala writing a letter to CJI DY Chandrachud Electoral Bonds judgement)

 DY Chandrachud
Electoral Bonds: "आमच्या ऑफिसमध्ये कोणीतरी १० कोटींचे बॉण्ड ठेवून गेलं"; 'या' पक्षानं निवडणूक आयोगाला दिली माहिती

तुम्ही एक वरिष्ठ वकील आणि SCBA चे अध्यक्ष आहात. तुम्ही पत्र लिहून माझ्या सू मोटोच्या अधिकारांना आव्हान दिलं आहे. हे सर्व प्रसिद्धीसाठी सुरु आहे. त्यामुळे आम्ही यात लक्ष घालणार नाही. मला आणखी काही बोलायला लावू नका. कारण, ते सन्मानजनक नसेल, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अग्रवाल यांना म्हटलं आहे.

 DY Chandrachud
Electoral Bonds: निवडणूक रोख्यांसंदर्भातील नवीन माहिती आली समोर; आयोगाने वेबसाईटवर केली अपलोड

द्रौपदी मुर्मू यांना पत्र

अधीष अग्रवाल यांनी यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं. सुप्रीम कोर्टाचा निवडणूक रोख्यांसंदर्भात देण्यात आलेला निर्णय अयोग्य आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला लागू न करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी अग्रवाल यांनी राष्ट्रपतींकडे केली होती. त्यांची ही मागणी मुर्मू यांनी स्पष्ट शब्दांत नाकारली होती. तसेच, अग्रवाल यांच्या विचारांवर टीका केली होती सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांना कमकूवत करण्याचा हा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.

सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीला ऐतिहासिक निर्णय दिला होता. यात २०१८ मध्ये मोदी सरकारने आणलेल्या निवडणूक रोख्यांना सुप्रीम कोर्टाने असंविधानिक ठरवलं होतं. शिवाय, निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांसंदर्भातील सर्व माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने रोख्यांसंदर्भातील माहिती आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com