चिक्कीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्यात असंतृप्त चरबी असते. शालेय मुलांना चिक्की वाटण्यावर बंदी घालण्यात आली होती.
बंगळूर : मुलांच्या आरोग्यावर (Health) शेंगदाणा चिक्कीचा विपरित परिणाम होत असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (School Education Department) सोमवारी आदेश जारी करून माध्यान्न पोषण आहारात पूरक म्हणून अंडी किंवा केळी वाटण्याचे निर्देश दिले आहेत.