esakal | शिक्षणाची ओढ! होडीत भरली 'पाठशाला'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Katihar, Bihar

शिक्षणाची ओढ! होडीत भरली 'पाठशाला'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

sakal_logo
By
सुधीर काकडे

देशात सध्या अनेक राज्यांत मुसळधार (Heavy Rain) पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढत्या पावसामुळे गंगा नदीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याने बिहारच्या (Bihar) कटिहार जिल्ह्यातील अनेक गावांत पाणी शिरले (Flood) आहे. अशा परिस्थितीमध्ये गावातील काही तरुणांनी मिळून थेट नावेवर शाळा भरवली आहे. गावात पाणी तुंबले असल्याने गावात ज्या ठिकाणी शिकवणी भरायची तिथे तो भाग आता पाण्यात आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे नुकसान होऊ नये या हेतून गावात कोचिंग क्लास चालवणाऱ्या तीन युवकांनी आपल्या कामात खंड पडु नये म्हणून थेट नदीत नाव सोडत त्यावर शाळा भरवली.

गावातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ध्यास घेतलेले हे तरुण मागच्या अनेक दिवसांपासुन त्यांच काम निशुल्क करत असल्याची माहिती गावातील लोकांनी दिली असल्याते एनडीटीव्हीने सांगितले आहे. राज्यात पुर आला असुन शासन वेगवेळ्या पद्धतिने मदत करते आहे, मात्र आपण देखील आपल्या परिने योगदान देणे आवश्यक आहे या भावनेने काम अविरतपणे सुरु ठेवले आहे.

हेही वाचा: सरकार को मिलेगी वोट की चोट;पाहा व्हिडिओ

गंगेत तरंगत्या बोटीवर भरलेल्या या शाळेचं अनेकांकडून कौतूक केले जाते आहे. गावात सगळीकडे पाणी आहे, गावाबाहेर जाणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे बोटीवरची भरणारा वर्गच आम्हाला सुरक्षित वाटत असल्याचे या ठिकाणचे विद्यार्थी सांगतात.

loading image
go to top