
आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या दुधात मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. (Scientists In Italy Find Microplastics In Human Breast Milk For The First Time )
इटलीतील एका संशोधकांच्या पथकानं आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक शोधले आहेत. यासोबतच या दुधाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. हे संशोधन करताना शास्त्रज्ञांनी, एका 34 वर्षीय आईच्या अनेक चाचण्या घेतल्या.
या महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या दुधात प्लास्टिकचे कण आढळल्याचं शास्त्रज्ञांच्या संशोधनादरम्यान निष्पन्न झाले आहे. आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक सापडले असल्यानं संशोधकांच्या एका गटानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, गरोदर असताना महिला प्लास्टिकमध्ये पॅक करण्यात आलेले पदार्थ, पेय आणि सीफूड्सचं यांचं सेवन करतात. त्यासोबतच वैयक्तिक स्वच्छतेसाठी प्लास्टिकयुक्त उत्पादनांचा वापर करतात. याचा मायक्रोप्लास्टिकच्या उपस्थितीशी कोणताही संबंध नाही.
2020 मध्ये इटलीमधील टीमनं मानवी प्लेसेंटामध्ये मायक्रोप्लास्टिक्स शोधलं. "ईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक्सच्या उपस्थितीचे पुरावे अर्भकांच्या असुरक्षितेबाबत मोठी चिंता वाढवतात", असं इटलीतील अँकोना येथील युनिव्हर्सिटी पॉलिटेक्निका डेले मार्चे येथील डॉ. व्हॅलेंटीना नोटरस्टेफानो यांनी सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.