सरासरीच्या 97 टक्के पाऊस हवामान खात्याचा दुसरा अंदाज जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 मे 2018

विभागानुसार अंदाज 
(दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत, टक्‍क्‍यांमध्ये) 

वायव्य भारत - 100 
मध्य भारत - 99 
(विदर्भ, मराठवाड्याचा समावेश या विभागात होतो) 
दक्षिण भारत - 95 
ईशान्य भारत 93 

नवी दिल्ली - मॉन्सूनचा सुधारित अंदाज जाहीर करताना हवामान खात्याने या वर्षात देशभरात पावसाची दीर्घकालीन सरासरी 97 टक्के राहील, असे म्हटले आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनचे कालच केरळच्या किनाऱ्यावर आगमन झाले आहे. वेळापत्रकाच्या तीन आधीच दाखल झालेल्या मॉन्सूनची उत्तरेच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू झाली आहे. 

हवामान खात्याने एप्रिलच्या मध्यात मॉन्सूनचा प्राथमिक अंदाज जाहीर करताना यंदाच्या वर्षात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी एवढा म्हणजे 97 टक्के पाऊस होईल, असे सांगितले होते. आता पुढील सुधारित अंदाज जाहीर करताना 97 टक्‍क्‍यांचाच पुनरुच्चार करताना चार टक्‍क्‍यांची वध-घट होऊ शकते, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. पावसाचा सुधारित अंदाज हवामान खात्यातर्फे जुलैमध्ये जाहीर केला जाणार आहे. 

दरम्यान, केरळ किनारपट्टीवर तीन दिवस आधीच पोचलेल्या मॉन्सूनची दमदार वाटचाल सुरू असून येत्या 24 तासांमध्ये मध्य अरबी समुद्राचा काही भाग, केरळचा उर्वरित भाग, कर्नटकची किनारपट्टी, दक्षिण भारतातील मध्यवर्ती क्षेत्र, मध्य भारतातील पूर्वेकडचा भाग त्याचप्रमाणे बंगालचा उपसागर, ईशान्य भारत या भागामध्ये मॉन्सूनचा विस्तार अपेक्षित आहे. 

विभागानुसार अंदाज 
(दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत, टक्‍क्‍यांमध्ये) 

वायव्य भारत - 100 
मध्य भारत - 99 
(विदर्भ, मराठवाड्याचा समावेश या विभागात होतो) 
दक्षिण भारत - 95 
ईशान्य भारत 93 

 

Web Title: second forecast of the weather department, 97 percent of the average rainfall released