कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग; डाग्नोस्टिक सेंटर्सचं निरीक्षण

पॉझिटिव्ह रुग्णांना तोंडाला कोरड, मळमळ, डोकेदुखीसारखी नवी लक्षण जाणवत आहेत.
Coronavirus
CoronavirusFile Photo

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसऱ्या लाटेनं थैमानं घातलं आहे. या लाटेतील संसर्गाचं प्रमुख निरीक्षण म्हणजे यामध्ये वृद्ध लोकांऐवजी तरुण मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत असल्याचं दिसून आलंय. त्याचबरोबर तोंडाला कोरड येणं, मळमळणं आणि डोकेदुखी सारखी लक्षणंही दिसून येत आहेत. काही डायग्नोस्टिक कंपन्यांनी ही निरीक्षणं नोंदवली आहेत. टाइम्सनाउन्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

Coronavirus
देशात युद्धपातळीवर रेमडेसिव्हीरचं उत्पादन सुरु; दररोज तयार होणार ३ लाख डोस

दिल्लीस्थित जेनेस्ट्रिंग्ज डाग्नोस्टिक्स सेंटरच्या संचालिका गौरी अगरवाल यांनी सांगितलं, "कोरोनाच्या या नव्या लाटेमध्ये बाधित रुग्णांमधील आजाराची लक्षणं ही पहिल्या लाटेपेक्षा वेगळी आहेत. प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाकडून तापाच्या तक्रारी नाहीत. पण तोंडाला कोरड येणं, आतड्यांसंबंधीच्या समस्या, मळमळ, जुलाब, डोळे लाल होणे आणि डोकेदुखी अशी लक्षण आढळून येत आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्तींपेक्षा तरुण व्यक्तींमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण वाढलं आहे."

Coronavirus
रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा येणार; चार कंपन्याकडून इंजेक्शन मिळणार

त्याचबरोबर कोविड-१९ चाचण्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच घरी येऊन चाचण्या करण्याची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे ही परिस्थिती हाताळणं आता कठीण बनलं आहे. यासाठी पायाभूत सुविधा आणि मशिन्सची अडचण नाही पण २४ तासांच्या आत नमुन्यांची ICMR नोंद करण्याचा सरकारचा नियम ही खरी अडचण आहे, असंही अगरवाल यांनी म्हटलंय.

दरम्यान, देशात रविवारी आजवरची दिवसभरातील सर्वांत वाईट आकडेवारी समोर आली आहे. एकाच दिवसात तब्बल २,६१,५०० नवे रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर १,५०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. रविवारी देशात एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८,०१,३१६ नोंदवली गेली.

दोन आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट

देशात गेल्या दोन आठवड्यांत कोरोना पॉझिटिव्ही रेटमध्येही वाढ झाली आहे. गेल्या १२ दिवसांतील डेली पॉझिटिव्हीटी रेट हा दुप्पट झाला आहे. ८ टक्क्यांहून तो १६.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर गेल्या महिन्याभरात आठवड्याचा राष्ट्रीय पॉझिटिव्हीटी रेट ३.०५ टक्क्यांहून १३.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे, आरोग्य मंत्रालयानं निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com