naxalitesakal
देश
Naxalite : नक्षलवादावर घाव! म्होरक्यासह २७ जण मारले; एक जवान हुतात्मा
भारतीय सुरक्षा दलांना आज नक्षलवादविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले.
नारायणपूर (छत्तीसगड) - भारतीय सुरक्षा दलांना आज नक्षलवादविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या मोठ्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले, तर त्याचवेळी एक जवान हुतात्मा झाला. ही चकमक नक्षलग्रस्त अबूझमाड भागात झाली. या चकमकीत नक्षलवादी संघटनेचा प्रमुख व या चळवळीतील प्रमुख म्होरक्या नंबाला केशव राव ऊर्फ बसवराजू ठार झाला.