esakal | वृद्ध प्रेमी युगलाला एकांतात पकडले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

senior citizen lover beating at bihar

वृद्ध प्रेमी युगल एकांतात बसले होते. एका टोळक्याने त्यांना पाहिल्यानंतर मारहाण करत विवाह करण्यास भाग पाडले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वृद्ध प्रेमी युगलाला एकांतात पकडले अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुर्णिया (बिहार): वृद्ध प्रेमी युगल एकांतात बसले होते. एका टोळक्याने त्यांना पाहिल्यानंतर मारहाण करत विवाह करण्यास भाग पाडले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पत्नी म्हणाली मला एकदा तरी त्याच्याशी बोलू द्या...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका ठिकाणी वृद्ध प्रेमी युगल बसले होते. एका टोळक्याने त्यांना मारहाण केली. शिवाय, वृद्ध नागरिकाचे मुंडन करून गळ्यात चपलांचा हार घालून गावातून फिरवले. शिवाय, विवाह करण्यास भाग पाडले. मारहाण केल्यानंतर वृद्धाने महिलेच्या भांगात कुंकू भरले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वृद्धाने टोळक्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

लग्नाची बोलणी सुरू असतानाच तिने काढला पळ...

पोलिस अधिकारी मनीष कुमार झा यांनी सांगितले की, 'वृद्ध प्रेमी युगलाला एका टोळक्याने मारहाण करत विवाह करण्यास भाग पाडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर वृद्धाने तक्रार दाखल केली आहे. शिवाय, महिलेच्या भांगामध्ये कुंकू भरत असताना पोलिस उपस्थित होते. याबाबतची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.'

वहिणीकडे सतत का पाहता असे म्हणाली अन्...

loading image