
रविंद्रनाथ यांची नुकतीच प्रशिक्षण महासंचालक या पदावर बदली करण्यात आली होती.
आमदारांच्या कुटुंबीयांची चौकशी करणाऱ्या IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा
बंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकात (Karnataka) विविध प्रकारच्या घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय. हिजाब वाद, लाऊडस्पीकर, पेपर फुटीप्रकरण यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्याच्या राजीनाम्यानं खळबळ उडालीय. वरिष्ठ आयपीएस अधिकारी पी. रविंद्रनाथ (IPS officer P. Ravindranath) यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिलाय. याबाबत त्यांनी थेट मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यात गंभीर आरोप केलेत. दोन आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकारचा दबाव वाढत असल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राज्यात आहे.
दरम्यान, रविंद्रनाथ यांनी त्यांच्या सेवेत चौथ्यांदा राजीनामा दिलाय. रविंद्रनाथ यांच्याकडं नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचं महासंचालक हे पद होतं. त्यांची नुकतीच प्रशिक्षण महासंचालक या पदावर बदली करण्यात आली होती. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळंच आपली कोणत्याही ठोस कारणाशिवाय बदली करण्यात आल्याचा आरोप रविंद्रनाथ यांनी केलाय.
हेही वाचा: 'त्या वक्तव्यांवर लोक हसतात, त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत'
यापूर्वीही त्यांनी वरिष्ठांकडून छळ करून पदोन्नती डावलली जात असल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता. रविंद्रनाथ यांनी कर्नाटकच्या (karnataka) मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, मुख्य सचिवांच्या उदासीनतेमुळं वेदना होत आहेत. आपली मुदतीपूर्वीच बदली करण्यात आलीय. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई सुरू केल्यानं ही बदली करण्यात आल्याचं रविंद्रनाथ यांनी म्हटलंय. रविंद्रनाथ यांनी नुकतीच याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमदार रेणुकाचार्य (MLA Renukacharya) यांची मुलगी आणि एका विधान परिषद आमदाराच्या कुटुंबातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची माहिती दिली होती.
Web Title: Senior Ips Officer P Ravindranath Resigned Karnataka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..