
Booster : कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लसीच्या किमती कमी करण्याची घोषणा
पुणे : अठरा वर्षांवरील व्यक्तींना उद्यापासून (दि. 10) कोरोनाचा प्रिकॉशनरी डोस देशातील खासगी रूग्णांलयामध्ये देण्यात येणार आहे. या दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकतर्फे मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासगी रूग्णांलयांसाठी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिच्या तिसऱ्या बुस्टर डोसासाठीचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार ही लस खासगी रूग्णांलयांना केवळ 225 रुपयात मिळणार आहे. याआधी कोविशील्ड लस खासगी रूग्णालयांना 600 रुपये प्रति डोस देण्याचे सांगण्यात आले होते. तर भारत बायोटेकसाठी 1200 रुपये प्रति डोस एवढी किंमत जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला असून, यासाठी खासगी रूग्णालयांना केवळ 225 रुपये प्रति डोस मोजावे लागणार आहेत. (Serum And Bharat Biotech Reduce Price Of Covid Vaccine)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry Of Health) आज 18 वर्षांवरील व्यक्तींना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा बूस्टर (Corona Booster Dose) डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या 18 वर्षांवरील व्यक्तींच्या बुस्टर डोसचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डच्या (Covishild) बुस्टर डोससाठी नागरिकांना खासगी रूग्णालयांना प्रतिडोस 600 रुपये मोजावे लागतील, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शुक्रवारी सांगितले होते. (Booster Dose For Adults From 10th April) त्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता खासगी रूग्णालयांना कोविशील्डच्या प्रति डोससाठी 600 ऐवजी केवळ 225 रुपये प्रति डोस इतकी किंमत मोजावी लागणार आहे.
भारत बायोटेकनेही कमी केल्या किमती
कोविशील्ड पाठोपाठ भारत बायोटेकच्य़ा कोव्हॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतीदेखील कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार कोव्हॅक्सिनच्या प्रति डोससाठी खाजगी रुग्णालयांना 1200 रुपयांऐवजी 225 रुपये मोजावे लागणार आहे, अशी माहिती कंपनीच्या संयुक्त संचालक सुचित्रा एला यांनी सांगितले.
Web Title: Serum Institute Of India Has Decided To Revise The Price Of Covishield Vaccine For Private Hospitals
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..