serum on survical cancer | सीरमचं मोठं पाऊल! गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लवकरच स्वदेशी लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Serum Institute of India

सीरमचं मोठं पाऊल! गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लवकरच स्वदेशी लस

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात पहिली स्वदेशी क्वाड्रिव्हॅलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लस (qHPV) तयार करण्यासाठी पावलं उचलली आहेत. (Cervical Cancer) यासाठी त्यांनी बाजारात लशीची परवानगी मिळवण्यासाठी भारतीय औषध नियामक मंडळाकडे अर्ज केला आहे.

त्यामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविधात लवकरच भारतीय बनावटीची लस उपलब्धत होणार आहे. याची सुनिश्चिती करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्याने सीरमने 2/3 क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत.

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांना दिलेल्या अर्जात, सीरमचे विभागीय संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी CERVAVAC या लसीसंदर्भात माहिती दिली आहे. सीरमच्या लशीने कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या विषाणूविरोधात 1000 पट जास्त प्रतिपिंड तयार केली आहेत. या प्रतिसादामुळे डॉक्टरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा प्रकार सर्व वयोगटांमध्ये लागू होतो. सीरमने बुधवारी या लसीचा डेटा आणि उपयुक्ततेचा आढावा घेण्यासाठी NTAGI ने स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी प्रेझेंटेशन देण्यात आलं. डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली हे सादरीकरण कऱण्यात आलं.

15 ते 44 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक होणाऱ्या कर्करोगात भारतातील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे. यासोबत हे पण लक्षात घेण्यासारखं आहे की सध्या आपला देश HPV लसीसाठी पूर्णपणे परदेशी उत्पादकांवर अवलंबून असल्याचं विभागीय संचलाक सिंग यांनी सांगितलं. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विविध औषधं आणि लसी उपलब्ध करून देण्याचा कायम प्रयत्न केला आहे. उच्च दर्जाची 'मेड इन इंडिया' लस आपल्या देशातील आणि जगभरातील लोकांसाठी परवडणाऱ्या किमतीत, उपलब्ध करण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं ते म्हणाले.

इतर अनेक स्वदेशी जीवरक्षक लसींप्रमाणेच भारतातील पहिल्या स्वदेशी qHPV लसीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. देशाला 'आत्मनिर्भर' बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वदेशी आणि 'कॉल फॉर लोकल'चं स्वप्न साकार होईल. 'मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड' चं उद्दिष्ट सुद्धा यामुळे साध्य करता येणार असल्याचं सीरमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

टॅग्स :Virus