esakal | सीरमकडून नोवाव्हॅक्सच्या लहानग्यांवरील क्लिनीकल चाचण्या जुलैपासून
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus vaccine oxford serum institute adar poonawalla tweet

सीरम नोवाव्हॅक्सच्या लहानग्यांवरील चाचण्या घेणार जुलैपासून

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरताना दिसून येत आहे. मात्र, यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. तज्ज्ञांनी असा दावा केलाय की, या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसणार आहे. केंद्र सरकारने हाच इशारा आता गांभीर्याने घेतला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवरच एक महत्त्वाची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून येत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने नोव्हॅव्हॅक्स लशीच्या क्लिनिकल ट्रायल्स जुलै महिन्यात सुरू करण्याची योजना आखली आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून अद्याप या माहितीला दुजोरा मिळाला नाहीये. मात्र संबंधित सूत्रांचं असं म्हणणं आहे की, कंपनी जुलै महिन्यामध्येच लहान मुलांसाठीच्या नोवव्हॅक्स लशीची ट्रायल सुरु करण्याची योजना बनवत आहे. याआधी मंगळवारी भारत सरकारकडून म्हटलं गेलं होतं की, कोरोनाच्या विरोधात नोवाव्हॅक्स लशीची परिणामकारकता आणि प्रभावशीलता सकारात्मक आहे.

नीती आयोगाचे सदस्या डॉ. वीके पॉल यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरुन देखील हेच संकेत मिळतात की नोवाव्हॅक्सची लस सुरभित आणि खूपच प्रभावी आहे.

loading image
go to top