पोटनिवडणुकीच्या निकालाचा भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांना झटका

Basavaraj Bommai
Basavaraj Bommaiesakal
Summary

महाराष्ट्रासह देशभरातील 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. त्यासाठी 30 ऑक्टोबरला मतदान, तर 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं एकूण 15 जागांवर विजय मिळवला. तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं सर्वच्या सर्व म्हणजेच, चार जागांवर विजय मिळवलाय. मंगळवारी 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांसमोर अडचणी निर्माण करू शकतात. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर (CM Jai Ram Thakur) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

भाजपनं गेल्या सहा महिन्यांत चार मुख्यमंत्री बदलले आहेत. यात गुजरातमध्ये विजय रुपाणी, कर्नाटकात बीएस येडियुरप्पा, उत्तराखंडात त्रिवेंद्र सिंह रावत आणि तीरथ सिंह रावत यांचा समावेश आहे. हिमाचलमध्ये भाजपचा दारुण पराभव झालाय. जिथं विरोधी काँग्रेसनं त्यांच्या खात्यात तीन विधानसभा आणि एक लोकसभेची जागा जिंकलीय. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी हा पराभव स्वीकारलाय. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं 'भावनिक कार्ड' खेळत हा विजय संपादन केल्याचा आरोप भाजपनं केलाय.

Basavaraj Bommai
'कांटे की टक्कर'! निवडणुकीत दोन्ही राजे एकमेकांविरुध्द भिडणार?

हिमाचल प्रदेशात काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण, हा निकाल भाजपसाठी धोकादायक ठरु शकतो. गुजरातमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार होत्या, पण सरकारच्या टीकेवरून लक्ष हटवण्याच्या प्रयत्नात भाजपनं संपूर्ण मंत्रिमंडळ बदललं. बोम्मईंसाठीही वेगळ्या प्रकारचे आव्हान आहे. 30 ऑक्टोबर रोजी दोन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुका ही लिंगायत नेत्यासाठी पहिली मोठी निवडणूक होती. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी दीर्घ चर्चा केल्यानंतर येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आलं, त्यानंतर त्यांच्या जागी बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.

Basavaraj Bommai
उदयनराजेंचा निर्णय शिवेंद्रसिंहराजेंच्या हातात

भाजपनं सिंदगीची जागा जनता दलकडून (सेक्युलर) हिसकावून घेतलीय, तर हंगल या त्यांच्या मूळ मतदारसंघात भाजपचा पराभव हा बोम्मईंसाठी मोठा धक्का आहे. हा पराभव आणखीनच दुखावणार आहे, कारण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या जागेवर जोरदार प्रचार केला होता. या व्यतिरिक्त या पराभवामुळं त्यांची राज्य पक्ष युनिटमध्ये आपलं स्थान मजबूत करण्याची आणखी एक संधी हुकलीय. मात्र, बोम्मई यांनी ट्विट करत म्हंटलंय, की 'लोकशाहीत पराभव सामान्य आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

Basavaraj Bommai
राष्ट्रवादी-भाजप नेत्यांत जागा वाटपावरून खलबत्तं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com