
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकामध्ये दहशतवाद्यांनी आज केलेल्या ग्रेनेडहल्ल्यात सुरक्षा दलाच्या दोन जवानांसह सात नागरिक जखमी झाले आहेत. लाल चौकातील सर्वांत गजबजलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रताप पार्कनजीक हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या हल्ल्यातील सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. आज रविवार असल्याकारणाने व्यापारपेठेत मोठी गर्दी होती. दहशतवाद्यांनी याच गर्दीला लक्ष्य करीत हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने या परिसराला घेराव घातला.
दक्षिण काश्मीरमध्ये एनआयएचे छापे
काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांना पोलिस अधिकाऱ्यानेच मदत केल्याची घटना उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज सकाळी विविध ठिकाणांवर छापे घातले. दक्षिण काश्मीरमधील काही खासगी संस्थांची कार्यालये आणि निवासस्थानांचीही झडती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, काश्मीर पोलिस दलातील उपनिरीक्षक देविंदरसिंग याने दहशतवाद्यांना मदत केल्याची घटना उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्त करण्यात आला होता. हे छापे घालण्यापूर्वी एनआयएने या प्रकरणाशी संबंधित काही आरोपींची कसून चौकशी केली होती. दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी सिंग याच्यासह सय्यद नावेद मुश्ताक अहमद ऊर्फ नावेद बाबू, रफी अहमद रथार आणि शफी मीर यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना दक्षिण काश्मीरमधील काझीगुंडजवळील महामार्गावरून अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.