मोठी बातमी : काँग्रेसचे सात खासदार निलंबित; लोकसभा अध्यक्षांची कारवाई 

टीम ई-सकाळ
Thursday, 5 March 2020

नवी दिल्ली : लोकसभेत सत्ताधारी भाजप सदस्यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या सात आमदारांना निलंबित करण्यात आलंय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबनाची घोषणा केली. असभ्य वर्तनाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संसदेतील अर्थसंकल्पी अधिवेशनात सोमवारी काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये झालेल्या वादावादीवर आज कारवाई करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या कारवाईत बेन्नी बेहनान (केरळ), गुरूजीतसिंह औजला (पंजाब), डेन कुरियाकोसे (केरळ), आर युन्नीथन (केरळ), मनिकम टागोर (तमीळनाडू), गौरव गोगोई (आसाम), टीएन प्रथापन (केरळ) यांना निलंबित करण्यात आलंय. दरम्यान, सोमवारी (ता.२) काँग्रेस खासदार रम्या हरिदास आणि भाजप खासदार मीणा जसकौर यांच्यात धक्काबुक्की झाली. रम्या यांनी दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा संसद सभागृहात मांडण्यासाठी उभ्या राहिल्या असताना जसकौर यांनी त्यांना विरोध करण्यास सुरवात केली. जसकौर ज्या ठिकाणी बसल्या होत्या त्या ठिकाणी रम्या एक फ्लेक्स घेऊन गेल्या आणि बोलण्यापासून विरोध करू लागल्या. जसकौर आणि इतर भाजप नेते माघार घेत नसल्याचे दिसताच भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये धक्काबुक्कीला सुरवात झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven loksabha congress members suspended om birla decision