लग्नाच्या आमिषाने खूप काळ ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही : हाय कोर्ट

सकाळ ऑनलाईन
Thursday, 17 December 2020

या प्रकरणातील सुनावणीत कोर्ट म्हणाले की, लग्नाच्या वचनाकडे शारीरिक सुखाची लालसा म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. दोघांनी एकमेकांसोबत अधिक काळ शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही. अल्प काळात झालेल्या शारीरिक संबंधाचा समावेश बलात्काराच्या गुन्ह्यात मोडतो, असेही कोर्टाने नमुद केले.

नवी दिल्ली : जर लग्नाच्या आमिषाने महिला स्वत:च्या  संमतीने एखाद्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवत असेल, तर तो बलात्कार होत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे.  महिलेने एका व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील खटला न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिलेने एका व्यक्तीसोबत बराच काळ शारीरिक संबंध ठेवले होते. 

या प्रकरणातील सुनावणीत कोर्ट म्हणाले की, लग्नाच्या वचनाकडे शारीरिक सुखाची लालसा म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. दोघांनी एकमेकांसोबत अधिक काळ शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही. अल्प काळात झालेल्या शारीरिक संबंधाचा समावेश बलात्काराच्या गुन्ह्यात मोडतो, असेही कोर्टाने नमुद केले.   

दिल्ली गारठली; काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यायाधीश विभूती बाखरु यांनी या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार, लग्नाचे आमिष दाखवून पीडिता अल्प काळासाठी शारीरिक संबंध ठेवत असेल तर हा प्रकार बलात्कारामध्ये येतो. हे संबंध खूप काळापासून किंवा अनिश्चित काळापर्यंत असतील तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. काही प्रकरणात लग्नाचे वचन देऊन पीडितेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते. तिची इच्छा नसतानाही असा प्रकार घडू शकतो, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित प्रकरणातील आरोपीला सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले होते. त्यानंतर पीडितेने दिल्लीच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचा निर्णय कायम राखत उच्च  न्यायालयातही बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला दोषमुक्त करण्यात आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sex on marriage promise is not always rape says delhi hc