esakal | सुमित्रा महाजन यांच्या निधनाचे ट्विट शशी थरूर यांनी केलं डिलिट

बोलून बातमी शोधा

सुमित्रा महाजन यांच्या निधनाचे ट्विट शशी थरूर यांनी केलं डिलिट

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याचं ट्विट शशी थरूर यांनी केलं होतं.

सुमित्रा महाजन यांच्या निधनाचे ट्विट शशी थरूर यांनी केलं डिलिट
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याचं ट्विट शशी थरूर यांनी केलं होतं. मात्र त्यांना मिळालेली माहिती चुकीची असल्याचं सांगत ट्विट डिलिटही केलं. नवीन ट्विट करत थरूर यांनी म्हटलं की, मी आधीचं ट्विट डिलिट केलं आहे. काही लोकांकडून अशा प्रकारच्या बातम्या सांगितल्या जातात याचं आश्चर्य वाटतं. सुमित्रा महाजन यांना दीर्घायु लाभो आणि त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना.

शशी थरूर यांनी आधीच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाने दु:खी आहे. त्यांच्यासोबत अनेकदा सकारात्मक अशी चर्चा झाली त्या आठवणी लक्षात आहेत. यामध्ये त्यांनी आणि सुषमा स्वराज यांनी मला मॉस्कोतील ब्रिक्स परिषदेसाठी संसदीय प्रतिनिधींच्या समितीचं नेतृत्व करण्यासाठी सांगितलं होतं. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या शोकसंवेदना असं ट्विट केलं होतं.

भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनी सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं आहे. देव त्यांना दिर्घायुष्य देवो अशी प्रार्थनाही केली. याच ट्विटला रिप्लाय देताना थरुर यांनी आधीचं ट्विट डिलिट केल्याचं सांगितलं.