Shahpur Kandi Dam : अखेर झालं... तब्बल ४५ वर्षांनी भारताने आडवलं पाकिस्तानात जाणारं पाणी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Shahpur Kandi Dam Latest News : भारताने अखेर पाकिस्तानात जाणारे रावी नदीचे पाणी रोखले आहे.
 Shahpur Kandi Dam project india stops ravi river water flow to pakistan dam in punjab marathi news
Shahpur Kandi Dam project india stops ravi river water flow to pakistan dam in punjab marathi news
Updated on

India stops Ravi river water flow to Pakistan : भारताने अखेर पाकिस्तानात जाणारे रावी नदीचे पाणी रोखले आहे. तब्बल ४५ वर्षांपासून वाट पहिली जात असलेले रावी नदीवरील शाहपूर कंडी धरण अखेर पूर्ण झालं असून त्यामुळे कित्येक वर्षांपासून पाकिस्तानात वाहून जाणारं पाणी बंद करण्यात आले आहे.

जागतीक बँकेच्या देखरेखीखाली १९६० मध्ये झालेल्या सिंधू जल कराराअंतर्गत रावीच्या पाण्यावर भारताचा विशेष अधिकार आहे. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात शाहपूर कंडी बॅरेज जम्मू काश्मीर आणि पंजाब यांच्यातील वादामुळे अडकून पडला होता. मात्र मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाणी पाकिस्तानात वाहून जात होतं.

 Shahpur Kandi Dam project india stops ravi river water flow to pakistan dam in punjab marathi news
Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिंधू जल कराराअंतर्गत रावी, सतलज आणि व्यास नद्यांच्या पाण्यावर भारताचा संपूर्ण अधिकार आहे. तर सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे. १९९७ मध्ये पंजाब आणि जम्मू-काश्मीर सरकारांनी पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी रंजीत सागर धरण आणि डाउनस्ट्रीम शाहरूर कंडी बॅरेज तयार करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत जम्मू-काश्मीरचे तात्कालीन मुख्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्ला आणि पंजाबचे प्रकाश सिंह बादल यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

१९८२ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या योजनेची पायभरणी केली होती, त्यानंतर १९९८ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. रणजीत सागर धरणाचे बांधकाम २००१ मध्ये पूर्ण झाले होते, शाहपूर कंडी बॅरेज तयार होऊ शकलं नाही आणि रावी नदीचं पाणी पाकिस्तानला मिळत राहिलं. २००८ मध्ये शाहपूर कंडी योजनेला राष्ट्रीय योजना घोषित करण्यात आलं होतं. मात्र बांधकाम २०१३ मध्ये सुरू झालं. २०१४ मध्ये पंजाब आणि जम्मू काश्मीर यांच्यात वादा सुरू झाल्याने ही योजना पुन्हा लांबत गेली.

 Shahpur Kandi Dam project india stops ravi river water flow to pakistan dam in punjab marathi news
Aamir Khan In Pune : आमिर खान पुणे विमानतळावर झाला 'स्पॉट'! 'लापता लेडीज'शी आहे खास कनेक्शन?

फायदा काय होणार?

अखेर २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या मध्यस्थीमुळे दोन्ही राज्यांमध्ये करार झाला, यानंतर हे धरण बांधण्यास सुरूवात झाली. यामुळे पाकिस्तानात जाणारं पाणी आता जम्मू काश्मीर मधील दोन प्रमुख जिल्हे कठुआ आणि सांबा येथे मोठा प्रदेश सिंचनाखाली येणार आहे. ११५० क्यूसेक पाणी आता ३२,००० हेक्टर जमीनीच्या सिंचनासाठी वापरले जाईल. या धरणामुळे तयार होणाऱ्या वीजेचा २० टक्के लाभ जम्मू काश्मीरला मिळणार आहे.

पंजाब राजस्थानलाही होणार फायदा

५५.५ मीटर उंचीचं हे शाहपूर कंडी धरण एक बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पाचा भाग आहे, ज्यामध्ये एकूण २०६ मेगावॅट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्प आहेत. हे रणजीत सागर धरण प्रकल्पाच्या खाली ११ किमी अंतरावर रावी नदीवर बांधले आहे. धरणाचे पाणी जम्मू-काश्मीरशिवाय पंजाब आणि राजस्थानलाही मदत करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com