
रायपूर (पीटीआय) : केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न लाखो युवक पाहतात. अपयशामुळे अनेकजण नाउमेदही होतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी असणाऱ्या शिपायाने छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या (सीजीपीएससी) कठीण परीक्षेत उत्तीर्ण होत युवकांपुढे आदर्श निर्माण केला.