येळळूर (कर्नाटक) : ‘‘सीमालढ्यात येळ्ळूर गावचे योगदान मोठे आहे, अतुलनीय आहे. सीमालढ्यात अग्रेसर असलेल्या या लढवय्या गावात येण्याचा आनंद होत आहे. हे सैनिक आणि शिक्षकांचे गाव आहे. इतिहास घडविणारे हे गाव आहे. तालुक्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घ्यावाच लागेल. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्येही या गावाने दिलेले योगदान आम्हाला विसरता येणार नाही,’’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदच्चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.