
दिल्लीत येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलानाला 11 फेब्रुवारी, म्हणजे दहा दिवस आधीच राजकीय झालर लागली ती सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष व ज्येष्ठ राजकीय नेते शऱद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ``लढवैय्ये राजे महादजी शिंदे राष्ट्रीय पुरस्काराने’’ गौरवान्वित केले, त्या प्रसंगी. गेले चार दिवस त्यावरून जोरदार उलटसुलट चर्चा चालू आहे.