esakal | म्हणून सोरेन यांनी मानले शरद पवारांचे आभार
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar inspire us in jharkhand election says hemant soren

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांचे ट्विटरवरून राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आभार मानल्यानंतर सोरेन यांनी तुम्हीच आम्हाला प्रेरणा दिली असे म्हटले आहे. सोरेन यांनीच शरद पवार यांचे ट्विटरवर आभार मानले असून पवारांकडून प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले आहे.

म्हणून सोरेन यांनी मानले शरद पवारांचे आभार

sakal_logo
By
वृत्तसेवा

पुणे : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांचे ट्विटरवरून राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आभार मानल्यानंतर सोरेन यांनी तुम्हीच आम्हाला प्रेरणा दिली असे म्हटले आहे. सोरेन यांनीच शरद पवार यांचे ट्विटरवर आभार मानले असून पवारांकडून प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार यांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली, असल्याची प्रतिक्रिया सोरेन यांनी दिली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पायउतार व्हावे लागले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या विजयाबद्दल देशभरातून सोरेन यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.


या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

भाजपविरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांनीदेखील सोरेन यांचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सोरेन यांचे अभिनंदन केले. पवार यांच्या अभिनंदनाच्या ट्विटला उत्तर देताना सोरेन यांनी त्यांचे आभार मानले आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रात केलेल्या संघर्षामुळे आम्हाला झारखंडमध्ये भाजपविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सोरेन यांनी म्हटले आहे.