

Sharda Riverfront
esakal
उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील टनकपूर येथे शारदा नदीच्या तटावर वसलेले प्रसिद्ध 'शारदा घाट' आता एक जागतिक दर्जाचे धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. उत्तराखंड सरकारने या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यासाठी तब्बल ३,३०० कोटी रुपयांच्या 'शारदा रिव्हरफ्रंट' (Sharda Riverfront) आणि भव्य आरती घाटाच्या निर्मितीची योजना आखली आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाचा मुख्य उद्देश टनकपूरला हरिद्वारच्या 'हर की पैडी' आणि ऋषिकेशच्या घाटांप्रमाणे एक आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रस्थापित करणे हा आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'ड्रीम प्रोजेक्ट' अंतर्गत या शारदा कॉरिडॉर (Sharda Corridor) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १८५.२० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला असून, लवकरच प्रत्यक्ष पुनर्रचना सुरू होणार आहे.