सोनाली फोगाट यांच्या शरिरावर जखमा नाहीत; गोवा पोलिसांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali Phogat Passed Away

सोनाली फोगाट यांच्या शरिरावर जखमा नाहीत; गोवा पोलिसांची माहिती

गोवा : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या शरिरावर धारदार शस्त्रांच्या जखमा आढळून आलेल्या नाही, असं स्पष्टीकरण गोव्याचे पोलीस महासंचालक ओएस बिश्नोई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Sharp weapon injuries on body of Sonali Phogat Shocking info from Goa police)

IGP बिश्नोई म्हणाले, महिला पोलीस अधिकाऱ्यानं सोनाली फोगाट यांच्या मृतदेहाची तपासणी केली यामध्ये त्यांच्या शरिरावर धारदार शस्त्रानं जखमा झालेलं आढळून आलेलं नाही. दरम्यान, या प्रकरणी अंजुना पोलीस ठाण्यामध्ये दोन व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली यांच्या भावानं या प्रकरणात सोनाली यांचा पीए आणि आणखी एका व्यक्तीचा हात असल्याचा आरोप केला होता. शवविच्छेदन अहवाल एक-दोन तासात येणं अपेक्षित आहे. सोनाली फोगाट यांचा मृतदेह आज रात्रीपर्यंत दिल्लीत दाखल होईल, अशी माहितीही यावेळी पोलीस महासंचालकांनी दिली.

दरम्यान, सोनाली फोगाट यांचं पार्थिव गोव्यातील दाबोलिम विमानतळावर दाखल झालं असून इथून ते त्यांच्या मूळ गावी हरयाणातील हिस्सार इथं नेण्यात येणार आहे.

सोनाली फोगाट यांचा भाऊ रिंकू फोगाट यांनी आरोप केला की, सोनाली यांचा गोव्याला येण्याचा कुठलाही प्लॅन नव्हता. त्यामुळं त्यांना इथं आणलं गेलं हा कटाचा भाग होता. या ठिकाणी कुठल्याही सिनेमाचं शुटिंग होणार नव्हतं. हॉटेलमध्ये दोन खोल्या केवळ दोन दिवसांसाठी बूक केल्या होत्या. या ठिकाणी २४ ऑगस्टला शुटिंग होणं अपेक्षित होतं पण खोल्या मात्र २१ आणि २२ ऑगस्टसाठी बूक करण्यात आल्या होत्या.

Web Title: Sharp Weapon Injuries Not Found On Body Of Sonali Phogat Says Goa Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GoaDesh news