
100 कोटी डोस : थरुरांकडून सरकारचं कौतुक, काँग्रेसनं सुनावलं
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी लसीकरणासंदर्भात ट्वीट केलं. देशातील १०० कोटी लसीकरणाचा मैलाचा टप्पा गाठण्यासाठी सरकारला श्रेय दिले पाहिजे, असं ट्वीट त्यांनी केलं. आता त्यांचे सहकारी पवन खेरा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. क्रेडिट देणं हा अपमान आहे, असं प्रतिपादन खेरांनी केलं. साथीच्या काळात चुकीच्या व्यवस्थापनामुळे लाखो कुटुंबांना त्रास झाल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय.
भारताने कोरोना विरुद्ध लसीकरण कार्यक्रमात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गुरुवारी भारताने 100 लशींचा टप्पा ओलांडला. या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना थरूर यांनी ट्विट केले, "ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. चला सरकारला श्रेय देऊ", असं त्यांनी ट्वीट केल्यानंतर काँग्रेसचे त्यांचे सहकारी पवन खेरा यांनी आक्षेप घेतला.
"दुसर्या कोरोना लाटेच्या ढिसाळ व्यवस्थापनानंतर आणि लसीकरणाच्या खरेदी प्रक्रियेत अडथळे खाल्ल्यानंतर सरकारने आता काही अंशी गोष्टींची पूर्तता केली आहे. मात्र आधीच्या अपयशासाठी तेच जबाबदार आहे," असे ट्वीट लोकसभा खासदार थरूर यांनी केले.