शेहला रशीदविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

सर्वोच्च न्यायालयातील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी शेहला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय लष्कर आणि सरकारविरोधात चुकीची माहिती पसरविल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवरून जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदने भारतीय लष्करावर आरोप करत केलेल्या ट्विटमुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी शेहला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय लष्कर आणि सरकारविरोधात चुकीची माहिती पसरविल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. येथील इंटरनेट व दूरध्वनी सेवा बंद आहेत. मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात आहेत. यावरून शेहला रशीदने ट्विट करत भारतीय लष्करावर आरोप केले आहेत. भारतीय लष्कराचे जवान काश्मीरमधील नागरिकांच्या घरांमध्ये जबरदस्तीने घुसून युवकांना ताब्यात घेत आहे, तसेच त्यांच्या घरात तोडफोडही करत आहे. जवान मुद्दाम रेशन फरशीवर फेकून देत आहेत आणि तांदळामध्ये तेल टाकून देत आहेत. शेहलाचे हे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आले आहे. भारतीय लष्करावर आरोप केल्याने ट्विटरवर #arrestShehlaRashid हा ट्रेंड सुरु आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shehla Rashid booked under sedition charges for allegedly spreading fake news against Army