

"अलिगढच्या 'शेखा तलावा'चा जागतिक डंका! उत्तर प्रदेशात आता १२ 'रामसर स्थळे'; विदेशी पक्ष्यांचा मुक्काम आता अधिक सुरक्षित"
Sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अलिगढ जिल्ह्यातील शेखा झील (Shekha Lake) या पाणथळ जागेला केंद्र सरकारने अधिकृतपणे 'रामसर स्थळ' (Ramsar Site) म्हणून घोषित केले आहे. या घोषणेमुळे उत्तर प्रदेश आता सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. शेखा झील हे आता उत्तर प्रदेशातील १२ वे आणि भारतातील ९९ वे रामसर स्थळ ठरले आहे. या यशामुळे भारत आता १०० रामसर स्थळांच्या ऐतिहासिक टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.