Chardham Yatra 2026: १४९ दिवसांनंतर भाविकांसाठी उघडले बद्रीनाथ धामचे कपाट! २५ क्विंटल फुलांनी सजले मंदिर

१४९ दिवसांनंतर बद्रीनाथ धामचे कपाट भक्तांसाठी खुले; २५ क्विंटल फुलांच्या अभूतपूर्व सजावटीत ‘चारधाम यात्रा २०२६’ला औपचारिक सुरुवात
उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील 'शेखा तलावा'ला केंद्राने ९९ वे 'रामसर स्थळ' म्हणून घोषित केले असून, यामुळे हा तलाव आता जागतिक नकाशावर आला आहे.

उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील 'शेखा तलावा'ला केंद्राने ९९ वे 'रामसर स्थळ' म्हणून घोषित केले असून, यामुळे हा तलाव आता जागतिक नकाशावर आला आहे.

Sakal

Updated on

उत्तराखंड : देवभूमी उत्तराखंडमध्ये आज भक्ती आणि उत्साहाचा महाकुंभ पाहायला मिळत आहे. गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ नंतर आज चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामचे कपाट विधीवत मंत्रोच्चारात उघडण्यात आले. यासह उत्तराखंडची 'चारधाम यात्रा २०२६' आता पूर्णपणे सुचारू झाली आहे.

आज सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत बद्रीनाथ मंदिराचे भव्य कपाट उघडण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी 'बद्रीविशाल की जय' अशा घोषणा दिल्या, ज्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com