राष्ट्रहिताच्या नजरेतून : भाजपचा कारभारही फूट पाडणाराच

गेले काही महिने मणिपूर शब्दशः धुमसत आहे. तेथील इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे तेथे घडणाऱ्या अनेक बाबी समोर येत नव्हत्या. जसजशा तेथील भयावह घटना समोर येत आहेत तसतसा देश हादरत आहे.
Manipur Childrens Migrate
Manipur Childrens Migratesakal

गेले काही महिने मणिपूर शब्दशः धुमसत आहे. तेथील इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे तेथे घडणाऱ्या अनेक बाबी समोर येत नव्हत्या. जसजशा तेथील भयावह घटना समोर येत आहेत तसतसा देश हादरत आहे आणि संतापाची लाट उसळत आहे. मणिपूरमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे.

त्यांनी मणिपूरमध्ये बदल घडवू असे आश्वासन देत सत्ता हस्तगत केली खरी; मात्र तसे घडलेच नाही. त्या आधीच्या काँग्रेसने अनेक चुका केल्याही असतील; पण भाजपने बदल करायला हवा होता. प्रत्यक्षात बिरेन सिंग यांनी नुकतीच केलेली विधाने ही भडकविणारी आणि फूट पाडणारीच आहेत.

मणिपूरमध्ये सध्या अराजकतेचे वातावरण आहे. तेथील बिघडलेल्या परिस्थितीमुळे तेथील मुख्यमंत्री एन. बिरेन यांचे सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर देशभरातून जोरदार टीका सुरू आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या प्रकाराला एक प्रकारचे गृहयुद्धच म्हणायला हवे अशी परिस्थिती आहे. त्याविषयीही भाजपसमर्थक तीन युक्तिवाद करताना दिसत आहेत. ते म्हणतात,

१) मुळातच राज्यात कधीही शांतता नव्हती. उलट भाजप सरकारने जास्तीत जास्त शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसनेच गेली अनेक दशके जाती-जातींमध्ये फूट पाडून ठेवली आहे, ती एवढ्यात दुरुस्त करता येणार नाही.

२) हे राजकीय कटकारस्थान असून सरकारला बदनाम करण्यासाठी संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या तोंडावर दहा महिन्यांनी त्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे.

३) भाजपच्या सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी याबाबत तातडीने या विषयाचे इतर पैलू पुढे करण्यास प्रारंभ केला. तेथील ख्रिश्चन कुकींकडून हिंदू मैतेईंवर हल्ला होत आहे आणि त्यासाठी चर्च मध्यवर्ती भूमिका बजावत आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनीही याला पूरक असेच उत्तर दिले आहे. त्यांच्या मते, या संघर्षात अनेक विदेशी (म्यानमारी कुकी) सहभागी आहेत. त्यामध्ये परदेशी (चीनच्या दिशेने अंगुलीनिर्देश) हातही आहे आणि कुकी आदिवासी, जंगलात अतिक्रमण करणारे, अवैध खसखस उत्पादक, अमलीपदार्थांचे तस्कर आणि दहशतवादी यांचाही समावेश आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर याविषयी जोरदार चर्चा करण्यापेक्षा शांतपणे या सर्व घटना-घडामोडींचा विचार करावा आणि आपल्या विवेकावर त्याला घासून घ्यायला हवे. भाजपने मांडलेला पहिला मुद्दा अगदी रास्त आहे. मणिपूरमध्ये १९७० पर्यंत तुलनेत सामान्य परिस्थिती होती. काँग्रेसचे शासन तेथे होते.

त्या कालावधीमध्ये अनेकदा हिंसक घटना, बंडखोरी, दहशतवाद आणि आंतरजातीय कलह सातत्याने होतच होते. आज मैईती आणि कुकी एकमेकांशी लढत आहेत. पूर्वी कुकी विरुद्ध नागा असा संघर्ष सुरू होता. जे भारतीय सरकारसोबत लढत होते ते नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडचे (एनएससीएन) प्रमुख टी. मुइवा हे मणिपूरचे आहेत, हे येथे ध्यानात घ्यायला हवे.

भाजपने येथे काँग्रेसकडून सत्ता मिळविली खरी; पण हे राज्य प्रचंड अडचणींनी वेढलेले आहे, हे सत्तेत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले आहे. राज्यातील जनतेने परिवर्तनाच्या आशेने त्यांना नवीन राजकीय शक्ती म्हणून स्वीकारले; पण काँग्रेसने वर्षानुवर्षे केलेल्या चुका भाजपने बदलण्याचा प्रयत्न करून जनतेला दिलासा द्यायला हवा होता. त्याऐवजी, त्यांनी ज्या काँग्रेसला बदनाम म्हटले त्याच काँग्रेसमधील काही नेत्यांना आपल्यासोबत घेतले. मुख्यमंत्री बिरेन सिंग त्यापैकीच एक आहेत.

राजकीय कार्यशैली आणि कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याऐवजी भाजप सरकारनेही केवळ फूट पाडण्याचे त्यांचे धोरण कायम ठेवले आणि त्यात मोठ्या प्रमाणात वाढच केली. त्याचे प्रमाण मुख्यमंत्र्यांच्या विधानांवरून लक्षात येते. मणिपूर धुमसायला सुरुवात झाल्यानंतरही ते सातत्याने भडकवणारी वक्तव्ये करत होते. १९ जून रोजीही ते तसेच बोलले.

बलात्कार आणि हत्यांच्या सात आठवड्यांनंतर आणि गृहयुद्ध सुरूच असताना, ते म्हणाले, “ही कृत्ये थांबायला हवी आहेत. मुख्यतः एसओओ (सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्स) कुकी अतिरेक्यांनी ते तातडीने थांबवावे; अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. मैईती लोकांनीही कायदा हातात घेऊ नये, असे मी त्यांना आवाहन करतो.’’

संघर्ष दोन गटांमधील

मणिपूरमध्ये ज्या दोन गटांत संघर्ष सुरू आहे त्या दोन्ही बाजू सशस्त्र आहेत. त्यापैकी एकाच गटाला ‘अतिरेकी’ संबोधून त्यांनाच खडसावले जात आहे, सूचना केली जात आहे आणि त्यांच्या बाजूने असणाऱ्या लोकांना बेकायदेशीर शस्त्र वापरू नका, असे आवाहन करत आहेत. दुसऱ्या बाजूच्या लोकांना कोणतीही सूचना केली जात नाही.

याबाबत काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. “एम-१६, एके-४७, स्निपर (रायफल्स) यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून नागरिकांवर हल्ले करणाऱ्‍या दहशतवाद्यांविरोधात आम्ही ऑपरेशन सुरू केले आहे” त्यांनाच ‘दहशतवादी’ संबोधल्यामुळे चित्र स्पष्ट होते. म्यानमारच्या भूमीतून परकीय पाठबळ दिले जात असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये नाव न घेता चीनवर टीका केलेली आहे.

भूतकाळात काँग्रेसने आपल्या राजकारणाने राज्याचे वांशिकदृष्ट्या विभाजन केले, हे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत; परंतु भाजपही त्यामध्ये बदल करण्याऐवजी त्यामध्ये वाढच करत आहे.

बाकी सध्या सुरू असलेल्या सर्व घटनांकडे हिंदू-ख्रिश्चन यांच्यामधील संघर्ष असे चित्र उभे करण्याचा सुरू असलेला प्रयत्न हा भाजपच्या रुजलेल्या विचारसरणीशी सुसंगत असाच दिसतो आहे. आसाम आणि मेघालय (‘सीसीए’-‘एनआरसी’ वर) ते आता मणिपूरपर्यंत, ही साधी बायनरी ईशान्येच्या गुंतागुंतीच्या चाचणीत अपयशी ठरली आहे.

आपल्या देशाच्या कोणत्याही भागात धर्म, जात, वंश, भाषा, प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, ईशान्येत मात्र हे थोडे किचकट आणि गुंतागुंतीचे आहे.

उदाहरणार्थ, नागा हा एक व्यापक गट आहे; परंतु त्यात २८ ते ३५ भिन्न जमाती आहेत, प्रत्येकाची स्वतःची भाषा, संस्कृती आणि भूतकाळातील युद्धाचा इतिहास आहे. आसाममध्ये भाजप काही मुस्लिमांना (मूळ रहिवासी) स्वीकारतो परंतु ‘सीसीए’-‘एनआरसी’ च्या आधारे इतरांना (बंगालीभाषिक स्थलांतरितांना) बाहेर काढायचे आहे.

कारण ते हेच कायदे हिंदूंना कायम ठेवण्यासाठी वापरतील, जरी परदेशी सिद्ध झाले तरीही. सर्व ‘परदेशी’ लोकांना बाहेर काढण्यासाठी अनेक दशके मोहीम राबवणारे आसामी हिंदू-मुस्लिम असा भेद करणार नाहीत. त्यांना सर्व बंगालीभाषिक ‘परदेशी’, हिंदू किंवा मुस्लिम याच्या बाहेर हवे आहेत.

केंद्राचा नेहमीच वेगळा धडा

देशाच्या मोठ्या भागांमध्ये असणारे कायदे-नियम-कार्य करणारी सूत्रे ईशान्येला लागू होत नाहीत. जर तुम्ही त्याच कुंचल्याने ते रंगवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आसाम (ज्यामुळे मेघालयातही मोठ्या प्रमाणात विरोध झाला) किंवा मणिपूरमध्ये जी आपत्ती आपण पाहत आहोत, त्याप्रमाणे माघार घ्यावी लागते. हा प्रदेश गुंतागुंतीचा, आव्हानात्मक आहे. येथे राज्य करण्यासाठी ठोस काम करणे आवश्यक आहे, केवळ विद्वेष पसरवून चालणार नाही. सध्या मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार त्याचेच उदाहरण आहे.

दुसरा गट, पीआरईपीएके (कांगलीपाकची पीपल्स रिव्होल्युशनरी आर्मी) चे नेतृत्व आर. के. तुलाचंद्र सिंग यांनी केले आणि पीएलएप्रमाणेच कट्टर साम्यवादाचा दावाही केला. १९८६ मध्ये तुलाचंद्रना लष्कराने मारले होते. या दोन मरणासन्न संघटनांच्या पार्श्वभूमीवर कांगलीपाक कम्युनिस्ट पक्षाचे (केसीपी) अनेक गट (शेवटच्या मोजणीत डझनभर) वाढले.

कांगलीपाक हे सभ्यता, मणिपूर (खोऱ्यातील प्रदेश)चे प्राचीन नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व बंडखोर पूर्णपणे मैईती आणि हिंदू होते. काहीही असले तरी या दशकांत आदिवासी लढ्यापासून दूर होते. फक्त ईशान्येतील सर्व वास्तवाची आठवण करून देण्यासाठी इतक्या तपशिलात, मी हे येथे नमूद केले आहे.

हे लक्षात घ्यायला हवे

मणिपूरमधील एकमेव बंडखोर हे मैईती हिंदू आहेत. १९७० च्या उत्तरार्धात दोन सशस्त्र बंडखोरी उभी राहिली. पहिली आणि सर्वांत महत्त्वाची, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) हिचे नेतृत्व नेमीरकपम बिशेश्वर सिंग याच्या नेतृत्वात होते, जो ल्हासा येथे चिनी लोकांकडून प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे घेण्यासाठी गेला होता आणि १९७८ मध्ये आपल्या १८ ‘कॉम्रेड्स’ सोबत ‘क्रांतिकारी’ युद्ध सुरू करण्यासाठी परतला होता.

लष्कराच्या (तत्कालीन) १७ जेएके रायफल्सचे सेकंड लेफ्टनंट सायरस अॅडी पिठावाला यांनी प्रसिद्ध टेकचम संघर्षात त्याला ठार केले होते. या कृतीसाठी पिठावाला यांना अशोक चक्र (आपला सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार) मिळाला आणि बिशेश्वर, नंतर सुटका होऊन राजकारणी बनले. त्यांचा उत्तराधिकारी कुंजबिहारी, १९८२ मध्ये कोडोमपोकपी येथे लष्करासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला.

अनुवाद : प्रसाद इनामदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com