esakal | Oxygen लेव्हल 23, महिनाभर व्हेंटिलेटरवर; 30 Kg वजन झालं कमी त्यानंतरही हरवलं कोरोनाला

बोलून बातमी शोधा

Corona
Oxygen लेव्हल 23, महिनाभर व्हेंटिलेटरवर; 30 Kg वजन झालं कमी त्यानंतरही हरवलं कोरोनाला
sakal_logo
By
नामदेव कुंभार

Shimla Man beats Corona : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. आपुऱ्या आरोग्य व्यवस्था आणि लोकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे जीव जात आहेत. ऑस्किजन, बेड, मृत्यू, कोरोना अशा दररोज नकारात्मक बातम्यांचा आपल्यासमोर भडिमार होतो. त्यामुळे लोकांमध्ये भितीच वातारण निर्माण झालं आहे. अशा निगेटिव्ह वातावरणात हिमाचल प्रदेशमधून पॉझिटिव्ह बातमीसमोर आली आहे, जी कोरोना संकटात अनेकांना नक्कीच हिंमत देईल. शिमाला शहरातील अन्न सुरक्षा अधिकारी अशोक मंगला यांनी अतिशय कठीण प्रसंगात कोरोनाला हरवलं. लाखो संकटांना सामोरं गेले पण जिद्द सोडली नाही. अशोक मंगला यांची स्टोरी अनेंकाना नक्कीच प्रेरणा देऊन जाईल, यात कोणतीही शंका नाही. अशोक मंगला यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी आयजीएमसी (IGMC) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अतिशय खालवली होती. ऑक्सिजन लेव्हल 23 वर घसरला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 27 दिवस अशोक यांनी कोरोनासोबत लढा दिला. यादरम्यान त्यांचं 30 किलो वजनही घटलं होतं. इतकं असतानाही अशोक यांनी जिद्द सोडली नाही. 27 दिवसानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांच्या या लढ्याची सर्व ठिकाणी चर्चा सुरु आहे. अशोक यांचा लढा कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांना प्रेरणादायी नक्कीच ठरणारा आहे.

अशोक मंगला यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तीन सप्टेंबर रोजी अशोक यांना ताप आला होता. त्यातच अशक्तपणाही जाणवत होता. उपचारासाठी त्यांनी थेट आयजीएमसी रुग्णालयात धाव घेतली. येथे त्यांनी सर्व चाचण्या केल्या. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. घरात वद्ध आई-वडिल आणि लहान मुलं असल्यामुळे अशोक यांनी सरकारी कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. सात सप्टेंबर रोजी त्यांचा एक्स-रे घेण्यात आला. रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आयजीएमसी रुग्णालयात उपचरासाठी जाण्याचा सल्ला दिला. आयजीएमसीमध्ये उपचार घेत असताना 12 सप्टेंबर रोजी अशोक यांची प्रकृती अधिकच खालावली. श्वासही घेता येईना. ऑक्सिजन लेव्हल 23 वर घसरला. प्रकृती खालावल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. दोन ऑक्टोबर रोजी प्रकृत्ती सुधारणा होण्यास सुरुवात झाली.

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आयजीएमसीमधून सोडण्यात आलं. पण घरी परतल्यानंतर पुन्हा प्रकृती खालवली. काही चाचण्या केल्यानंतर फुफुसापर्यंत कोरोना गेल्याचं समजलं. 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. सात दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर घरी सोडण्यात आलं. सध्या प्रकती ठणठणीत आहे. आजारातून सावरल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या नियमांचं पालन करत आहे, असं अशोक म्हणाले.