Shivsena News: सत्तासंघर्षावरील निकाल राखीव; पण कुठल्या मुद्द्यांवर निर्णय येणं अपेक्षित? : Shinde Vs Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde Vs Thackeray

Shinde Vs Thackeray: सत्तासंघर्षावरील निकाल राखीव; पण कुठल्या मुद्द्यांवर निर्णय येणं अपेक्षित?

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली असून पाच सदस्यीय खंडपीठानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. यावर निकाल कधी देणार हे खडंपीठानं अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

पण नक्की कुठल्या मुद्द्यांवर निकाल येणं अपेक्षित आहेत, जाणून घेऊयात. (Shinde Vs Thackeray Maharashtra Power struggle verdict reserved But what issues are expected to be decided)

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तीवाद पार पडला. या प्रकरणात विविध मुद्द्यांवर निकाल येणं अपेक्षित आहे. पण सध्या हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडं जाणार की नाही? यावरच युक्तीवाद पूर्ण झाला आहे. इतर सर्व मुद्द्यांवर अद्याप युक्तीवाद व्हायचा आहे.

यासाठी कायद्याचा अक्षरशः किस पाडण्यात आला. पण आता निर्णय कोर्टानं राखून ठेवल्यानं शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी न्यायालयीन लढाई सध्या खूपच अटितटीची बनली आहे.

कुठल्या मुद्द्यांवर निकाल येणं अपेक्षित?

  1. प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं जाणार की नाही?

  2. नबाम प्रकरणानुसार सत्तासंघर्षाची सुनावणी होणार का?

  3. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार नक्की काय आहेत?

  4. अपात्रतेच्या नोटिसांवर कारवाई नक्की कोणी करायची?

  5. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा योग्य होता का?

  6. सध्याचं सरकार राहिल की जाईल?