भाजप-सेना शंभर टक्के युती होणार- मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती ही शंभर टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात असणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती ही शंभर टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात असणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही परवा मुंबईत युतीची घोषणा होण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी यावेळी वर्तविली आहे. तर, भाजपची पहिली यादी उद्या (ता.29) जाहीर होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्यासाठी भाजप निवडणूक समितीची बैठक आज रात्री साडेदहाच्या सुमारास संपली. मात्र पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थित अडीच तास खलबते होऊनही आज यादी जाहीर करण्यास भाजपला संपूर्ण अपयश आले.

शिवसेनेबरोबर च्या युतीत होणाऱ्या चर्चेत अखेरच्या क्षणी अनपेक्षित विघ्न आल्याने भाजप आज रात्री यादी जाहीर करू शकला नाही अशी चर्चा दिल्लीत आहे. आता उद्या (ता. 30) मुंबईत गरवारे क्रीडांगणात होणाऱ्या भाजप प्रवेशानंतर यादी जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

आजच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संघटनमंत्री विजय पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे हे राज्याचे मंत्री उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena and BJP Confirm Alliance For vidhan Sabha says CM devendra Fadanvis